Posts

Showing posts from March, 2022

प्रतिसरकारे

Image
१९४२ ची चळवळ सुरू झाल्यानंतर देशात ठिकठिकाणी शासकीय यंत्रणा विकलांग झाली. त्यानंतर स्थानिक लोकांनी प्रतिसरकारे स्थापन करून कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. इंग्रज सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या काही प्रदेशांत भारतीयांनी स्वतःची शासनयंत्रणा निर्माण केली. त्यात प्रामुख्याने बंगालमध्ये मिदनापूर ,  बिहारमध्ये भागलपूर ,  ओरिसात बालासुर ,  उत्तर प्रदेशातील बालिया, आंध्रमध्ये भिमावरम येथे स्थापन झालेल्या प्रतिसरकारांची नोंद घ्यावी लागेल. देशाच्या विविध भागातली ही प्रतिसरकारे फार काळ टिकू शकली नाहीत. मात्र महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले प्रतिसरकार देश पातळीवर गाजले. दीर्घकाळ कार्यरत राहिलेल्या या प्रतिसरकारने इंग्रज सत्तेला अखेरपर्यंत दाद दिली नाही. सातारा जिल्ह्यातील हे प्रतिसरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. त्याच्या स्थापनेत क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता. कुंडल येथे जीडी बापूंनी भूमिगत कार्यकर्त्यांसाठी लष्करी प्रशिक्षण केंद्र तसेच न्यायदानासाठी जनता न्यायालयाची स्थ